बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया SBI PO भरती २०२६ पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यंदा एकूण १५०० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
बँकिंग क्षेत्रात ‘SBI PO’ हे पद अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. आकर्षक पगार, भत्ते आणि करिअरमधील वेगवान प्रगती (Growth) यांमुळे दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात. जर तुमचेही स्वप्न स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी बनण्याचे असेल, तर या भरतीची संपूर्ण माहिती, पात्रता आणि परीक्षेचे स्वरूप नीट समजून घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना त्याचे वेळापत्रक माहित असणे आवश्यक आहे. SBI ने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:
- अर्ज करण्याची आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीख: ८ जुलै २०२६
- 1.पूर्व परीक्षा (Prelims Exam): ऑगस्ट २०२६
- 2.मुख्य परीक्षा (Mains Exam): सप्टेंबर २०२६
- 3.सायकोमेट्रिक टेस्ट, ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखत: ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२६
- अंतिम निकाल (Final Result): डिसेंबर २०२६ च्या सुमारास
एकूण जागांची विभागणी (Vacancy Details for SBI PO भरती २०२६)
यंदा एकूण १५०० उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये दोन प्रकारच्या जागांचा समावेश आहे.
| Open | ५८८ |
| EWS | १४४ |
| OBC | ३९० |
| SC | २३४ |
| ST | १४४ |
| Handicapped | ६१ |
सविस्तर विभागणी पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पात्रता निकष SBI PO भरती २०२६ (Eligibility Criteria)
SBI PO परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी खालील शैक्षणिक आणि वयाचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
१. शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- SBI PO भरती २०२६ यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील (Arts, Commerce, Science, Engineering इ.) पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी. यासाठी Percentage ची कोणतीही अट नाही.
२. वयोमर्यादा (Age Limit)
- SBI PO भरती २०२६ साठी उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल ३० वर्षे असावे.
- इथे category wise वयोमर्यादा दिली आहे..ती व्यवस्थित चेक करून घ्यावी.
- Open. २१ ते ३० वर्ष
- OBC साठी ३ वर्ष सवलत
- SC ST साठी ५ वर्ष सवलत
- Open अपंग १० वर्ष सवलत
- OBC अपंग १३ वर्ष सवलत
- SC ST अपंग १५ वर्षे सवलत
- माजी सैनिक ५ वर्ष सवलत
अर्ज शुल्क (Application Fee)
- General / EWS / OBC प्रवर्गासाठी: ₹७५०/-
- SC / ST / PwD प्रवर्गासाठी: कोणतेही शुल्क नाही (माफ)
३.वेतनश्रेणी (Payment of SBI PO भरती २०२६):
सुरुवातीला दरमहा ४८४८०/- रुपये. मिळेल. नंतर वाढत जाऊन ८५९२०/- रुपये होईल. याशिवाय सर्व बँकेच्या सोयी, सवलती, भत्ते मिळतील.
🚀 परीक्षेच्या तयारीसाठी यशाची रणनीती (Preparation Tips for SBI PO भरती २०२६)
१. बेसिक Concepts स्पष्ट करा: Quantitative aptitude आणि reasoning मधील मूलभूत नियम आणि shortcut tricks समजून घ्या. Shortcut tricks समजून घेतल्या तर त्याने तुमचा calculation साठी लागणारा वेळ वाचतो आणि तुम्हाला दुसरे question solve करण्यासाठी तो वेळ use होऊ शकतो.
२. चालू घडामोडी आणि बँकिंग नॉलेज: मुख्य परीक्षेसाठी गेल्या ६ ते ८ महिन्यांतील चालू घडामोडी (Current Affairs) आणि आर्थिक/बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा नियमित अभ्यास करा.
३. मॉक टेस्ट (Mock Tests): वेळेचे नियोजन शिकण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवा आणि स्वतःचे विश्लेषण करा. जेवढ्या जास्त टेस्ट solve केल्या तेवढी तुमची practice व्यवस्थित होईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे..practice makes perfect..
४. इंग्रजी वाचन: वर्णनात्मक परीक्षेसाठी रोज इंग्रजी वर्तमानपत्र (उदा. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस) वाचण्याची सवय ठेवा.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
- सर्वप्रथम स्टेट बँकेच्या अधिकृत SBI Careers Page ला भेट द्या.
- ‘Recruitment of Probationary Officers’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर IBPS SBI PO Portal या लिंकवर जाऊन नवीन नोंदणी (New Registration) करा.
- आवश्यक माहिती भरा, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरून form submit करा आणि त्याची printout जपून ठेवा.
निष्कर्ष:
SBI PO २०२६ ची ही भरती बँकिंग क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२६ आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपला अर्ज भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि सविस्तर माहितीसाठी official संकेतस्थळाला भेट द्या..
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.. आणि अशाच latest आणि महत्वाच्या जाहिरातीसाठी आमच्या इन्स्टाग्राम आणि facebook Page ला follow नक्की करा.