UPSC अंतर्गत UPSC Drug Inspector १८६ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांना या पदासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०२६ आहे उमेदवारांनी शेवट दिवसापर्यंत वाट न बघता लवकर ऑनलाइन अर्ज करावा.
UPSC Drug Inspector post १८६ जागांसाठी भरती २०२६ highlight
| विभाग किंवा संस्था | यूपीएससी UPSC |
| पद | Drug inspector |
| एकूण जागा | १८६ |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| अर्जाची सुरुवात दिनांक | २७ जून २०२६ |
| अंतिम तारीख | १७ जुलै २०२६ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत |
| अधिकृत संकेतस्थळ | UPSC website |
एकूण जागा (vacancy)
Total जागा 186 आहे त्यामध्ये category wise वर्गीकरण केले आहे खालील प्रमाणे बघा.
| General सर्वसाधारण | ५५ जागा |
| EWS | ४१ जागा |
| OBC | ३९ जागा |
| SC | ३५ जागा |
| ST | १६ जागा |
| दिव्यांग PWBD | ८ जागा (आरक्षित) |
| एकूण | १८६ |
वयोमर्यादा
Drug inspector या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे
| Category | कमाल वर्ष |
| सर्वसाधारण आणि EWS | ३० वर्ष |
| OBC | ३३ वर्ष ३ वर्ष सवलत |
| SC ST | ३५ वर्ष ५ वर्ष सवलत |
| दिव्यांग | ४० वर्ष १० वर्ष सवलत |
परीक्षा पद्धत exam pattern
UPSC अंतर्गत उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाईल लेखी आणि मुलाखत interviewलेखी परीक्षा ही MCQ multiple choice question पद्धतीने असणार त्यासाठी ३०० गुण आणि २ तास वेळ राहील .त्यानंतर interview साठी १०० गुण राहतील
Negative marking
प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी ०.३३ मार्क कट करण्यात येईलही परीक्षा सामान्यतः इंग्लिश भाषेत असेल.
अभ्यासक्रम syllabus for drug inspector post
यासाठी लेखी परीक्षेमध्ये फार्मसी आणि सामान्य ज्ञान या दोन वर आधारित असतो.
1.पहिला भाग (part 1): फार्मसी आणि संबंधित शास्त्र :
• मॅन्युफॅक्चरिंग फार्मसी manufacturing pharmacy
• फॉरेन्सिक फार्मसी आणि forensic pharmacy
• फार्मासिटिकल एनालिसिस pharmaceutical analysis
• मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री microbiology and biochemistry
• फार्मेकालॉजी आणि टॉक्सिकॉलॉजी pharmacology and toxicology
2.दुसरा भाग (second part): सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता general knowledge and aptitude
१.त्यात current affairs म्हणजेच चालू घडामोडी
२.भारतीय राज्यघटना आणि अर्थव्यवस्था constitution
३. reasoning म्हणजेच मूलभूत अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
४.सामान्य विज्ञान आणि मूलभूत इंग्रजी
शैक्षणिक पात्रता educational qualification
Drug inspector पदासाठी b pharm, pharmaceutical science, वैद्यकीय पदवी (MBBS) किंवा त्या रिलेटेड पदवी असणे आवश्यक आहे .
वेतन श्रेणी payment
दरमहा सुरुवातीला ४७६००/- असेल व सरकारच्या सर्व सवलती मिळतील.
परीक्षा फी application fee
- General OBC EWS पुरुष उमेदवारांसाठी – २५/-
- सर्व महिला SC ST आणि दिव्यांग PWBD उमेदवारांसाठी अर्ज फ्री असणार.
Required documents आवश्यक कागदपत्रे
- पदवी प्रमाणपत्र आणि सर्व वर्षांचे गुणपत्रक
- दहावीचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला
- Caste certificate
- OBC उमेदवारांसाठी non creamy layer important
- ओळखपत्रासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
- अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- फोटो आणि सही स्कॅन केलेला असावा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे हे डिजिटल स्वरूपात लागतील त्यासाठी हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात PDF तयार करा.
अर्ज कसा करावा how to apply
जे उमेदवार पहिल्यांदाच यूपीएससीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करत असतील त्यांना ओटीआर प्रोफाइल तयार करावे लागते.
- सर्वप्रथम यूपीएससी ऑनलाईन पोर्टल म्हणजेच अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तिथे new registration या ऑप्शनवर क्लिक करा
- त्यात तुमची संपूर्ण माहिती टाकून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
- तुमच्या मोबाईल आणि ईमेलवर आलेला ओटीपी पासवर्ड सेट करा आणि तो पासवर्ड लिहून घ्या . कारण नंतर जेव्हाही तुम्ही वेबसाईटवर लॉगिन कराल तेव्हा तुम्हाला हा पासवर्ड लागेल म्हणून तो व्यवस्थित लिहून ठेवा.
- ऑनलाइन लॉगिन apply for online recruitment या ऑप्शन वर क्लिक करा.
- तिथे तुम्हाला advertisement number ०७/२०२६ अंतर्गत ड्रग इन्स्पेक्टर ही पोस्ट दिसेल. तिथे apply now click करा.
- तिथे काही नियम व अटी दिलेल्या असतील त्या काळजीपूर्वक वाचून check box वर टिक करा आणि पुढे जा.
- कॅटेगरी वाईज वयाची सवलत म्हणजेच एज रिलॅक्सेशन हवी असल्यास Yes किंवा NO पर्याय निवडा.
- तुमची पदवी सिलेक्ट करा.
- तिथे दिलेली शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- तुमची सर्व पदवी आणि संबंधित गुणपत्रिकांची पीडीएफ फाईल तिथे अपलोड करा.
- त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन केलेली आणि त्यांच्या नियमानुसार तिथे अपलोड करा.
- ID साठी तुमचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा पॅन कार्ड PDF मध्ये अपलोड करा.
- त्यानंतर category wise application fee पे करा.
- फी भरण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा यूपीआयचा वापर करता येईल.
- तुम्ही फी भरून झाल्याच्या नंतर पूर्ण अर्जाची माहिती चेक करून घ्या आणि बरोबर असल्यास submit application या बटणावर क्लिक करा. तुमचा application यशस्वीरित्या submit झाला असल्यास तुमच्या ईमेलवर त्याचे कन्फर्मेशन ई-मेल येईल.
- तुमच्या अर्जाची PDF print out घेऊन ठेवा आणि डाऊनलोड करून ठेवा.
MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा २,६१९ पदांची मेगा भरती