MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा २,६१९ पदांची मेगा भरती जाहीर; येथे करा ऑनलाईन अर्ज.

MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत विविध सरकारी विभागांमधील एकूण २,६१९ रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती प्रक्रियेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत असाल, आणि या भरतीची आतुरतेने वाट पाहत असाल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे.

MPSC Group C Recruitment 2026 Overview

तपशीलमाहिती
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
परीक्षेचे नावमहाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६
एकूण पदे२,६१९ पदे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख२७ जून २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख१७ जुलै २०२६
संयुक्त पूर्व परीक्षा दिनांक२९ सप्टेंबर २०२६ (अंदाजे)
अधिकृत वेबसाईटMPSC ची official website

पदनिहाय संख्या आणि शैक्षणिक पात्रता (Post-wise Vacancy & Qualification)

या भरतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदांचा समावेश आहे जसे लिपिक, कर सहाय्यक आणि मोटार वाहन निरीक्षक या पदांचा समावेश आहे. पदनिहाय माहिती खालीलप्रमाणे:

१) लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) – १,८६४ पदे

  • शैक्षणिक पात्रता: लिपिक म्हणजेच clerk या पदासाठी कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्या कडे असणे आवश्यक आहे.
  • टंकलेखन (Typing) पात्रता: मराठी टंकलेखन वेग किमान ३० श.प्र.मि. (WordsPerMinutes) किंवा इंग्रजी टंकलेखन वेग किमान ४० श.प्र.मि. असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्हाला typing मध्ये १ मिनिटांत ३० शब्द मराठीमध्ये आणि ४० शब्द इंग्रजी मध्ये type करता यायला हवेत.

२) कर सहाय्यक (Tax Assistant) – २८२ पदे

  • शैक्षणिक पात्रता: यातसुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे.
  • टंकलेखन पात्रता: आणि मराठी ३० WPM आणि इंग्रजी ४० WPM (कर सहाय्यक पदासाठी दोन्ही प्रमाणपत्रे आवश्यक आहेत).

३) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) – ४६१ पदे

  • शैक्षणिक पात्रता: यासाठी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील किमान ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा तशाच पद्धतीची पदवी असावी.

४) उद्योग निरीक्षक (Industry Inspector) – ०९ पदे

  • शैक्षणिक पात्रता: या पदासाठी विज्ञान शाखेतील पदवी (B.Sc.) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग/नगररचना मधील डिप्लोमा असावा.

५) तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) – ०३ पदे

  • शैक्षणिक पात्रता: कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असावी

वयोमर्यादा (Age Limit) – (०१ ऑक्टोबर २०२६ रोजी)

  • (Open) प्रवर्ग: १९ ते ३८ वर्षे.
  • मागासवर्गीय /EWS/ अनाथ / खेळाडू: १८ ते ४३ वर्षे.
  • दिव्यांग उमेदवार: १८ ते ४५ वर्षे.
  • माजी सैनिक: सरकारी नियमांनुसार सवलत लागू.

परीक्षा फी (Application Fee)

MPSC Group C पूर्व परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय शुल्क खालीलप्रमाणे आहे:

  • खुला प्रवर्ग (Open Category): ₹ ३९४/-
  • मागासवर्गीय /EWS / अनाथ / दिव्यांग: ₹ २९४/-
  • माजी सैनिक: ₹ ४४/-

२०२६ परीक्षेतील महत्त्वाचे बदल (MPSC Online Exam)

यावेळच्या भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्व परीक्षा संगणकावर आधारित ऑनलाईन पद्धतीने (म्हणजेच Computer Based Test) होणार आहे.

परीक्षेच्या तयारीसाठी यशाची रणनीती (Preparation Tips for SBI PO भरती २०२६)

१. चालू घडामोडी आणि बँकिंग नॉलेज: मुख्य परीक्षेसाठी गेल्या ६ ते ८ महिन्यांतील चालू घडामोडी (Current Affairs) आणि आर्थिक/बँकिंग क्षेत्रातील घडामोडींचा नियमित अभ्यास करा.

२. मॉक टेस्ट (Mock Tests): वेळेचे नियोजन शिकण्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन मॉक टेस्ट सोडवा आणि स्वतःचे विश्लेषण करा. जेवढ्या जास्त टेस्ट solve केल्या तेवढी तुमची practice व्यवस्थित होईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे..practice makes perfect..

३. इंग्रजी वाचन: वर्णनात्मक परीक्षेसाठी रोज इंग्रजी वर्तमानपत्र (उदा. द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस) वाचण्याची सवय ठेवा. याने तुमचे इंग्रजी संभाषण आणि व्याकरण सुधारेल.


महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

  • अधिकृत जाहिरात PDF डाउनलोड करा:MPSC Group C Notification PDF
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी official संकेतस्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा: official website

टीप: अंतिम तारखेची वाट न पाहता उमेदवारांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा, जेणेकरून शेवटच्या क्षणी सर्व्हर डाऊन होण्याचा त्रास होणार नाही. नाहीतर शेवटच्या दिवसांमध्ये इंटरनेट वर जास्त load येऊन अर्ज भरण्यासाठी खूप वेळ लागू शकतो..

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.. आणि अशाच latest आणि महत्वाच्या जाहिरातीसाठी आमच्या इन्स्टाग्राम आणि facebook Page ला follow नक्की करा.

SBI PO भरती २०२६

१० business ideas for woman


2 thoughts on “MPSC Group C Recruitment 2026: महाराष्ट्र गट-क सेवा अंतर्गत पूर्व परीक्षा २,६१९ पदांची मेगा भरती जाहीर; येथे करा ऑनलाईन अर्ज.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top