सांगली बँक कनिष्ठ लिपिक (Junior Assistant) भरती २०२६ | संपूर्ण माहिती

नमस्कार, मी आज घेऊन आले आहे तुमच्या साठी नवीन एक संधी ज्याचे तुम्ही नक्कीच सोने करू शकता ते म्हणजे सांगली बँक कनिष्ठ लिपिक भरती म्हणजेच Junior Assistant भरती २०२६

यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कनिष्ठ लिपिक पदांसाठी ४४४ जागांची भरती जाहीर केली आहे.

बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यासाठी दिलेली माहिती जाणून घ्या..

सांगली बँक कनिष्ठ लिपिक भरती विषयी संक्षिप्त माहिती

बँकसांगली मध्यवर्ती सहकारी बँक
पदकनिष्ठ लिपिक (Clerk)
पदसंख्या४४४
अधिकृत वेबसाइटसांगली बँक वेबसाइट

सांगली बँक कनिष्ठ लिपिक भरती साठी शैक्षणिक पात्रता

यामध्ये उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच तो MSCIT उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही field चे पदवीधर असाल आणि तुमचे MSCIT कोर्स पास झालेले असाल तरीही चालेल.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख२४जून,२०२६
अंतिम तारीख८जुलै, २०२६

वयोमर्यादा

यात तुमचे वय म्हणजेच उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे असावे.

अर्ज कसा करावा

  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज करावा असे सांगण्यात आले आहे.
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांचा वैध ईमेल आयडी व मोबाईल नंबर असायला हवा.
  • उमेदवाराला ऑनलाइन अर्ज संकेतस्थळावर जाऊन करता येईल.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक ८ जुलै 2026 पर्यंत आहे.

निवड पद्धत

या परीक्षेसाठी उमेदवाराची निवड सर्वात आधी लेखी व मुलाखत याद्वारे केली जाते.

  • लेखी परीक्षा : म्हणजेच प्रथम पात्र उमेदवाराची ऑनलाईन लेखी परीक्षा होते त्यात MCQ पद्धतीने म्हणजेच बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा असते.
  • मुलाखत : लेखी परीक्षा मध्ये उत्तीर्ण असलेले विद्यार्थी मुलाखतीसाठी निवडले जातात.
  • चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातात म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग असते.

ऑनलाइन अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे

  1. पासपोर्ट साईज फोटो (फोटोचा बॅकग्राऊंड वाईट असायला हवा)
  2. उमेदवाराची सही (सही काळया पेनने केलेली असावी.)
  3. सर्व शैक्षणिक कागदपत्रे व गुणपत्रे
  4. अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  5. आधार कार्ड

संपूर्ण माहितीसाठी वर दिलेल्या official वेबसाईटला एकदा चेक करून घ्या.

परीक्षेवेळी लागणारी कागदपत्रे

ID Proof साठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड आणि प्रवेश पत्र हॉल तिकीट सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.. आणि अशाच latest आणि महत्वाच्या जाहिरातीसाठी आमच्या इन्स्टाग्राम आणि facebook Page ला follow नक्की करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top