10 Business Ideas For Women in 2025 | 2025 मध्ये महिलांसाठी व्यवसायाच्या कल्पना 2025 मध्ये प्रत्येक महिला ही आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण सुरु कुठून करायचे हेच कळत नाही म्हणून त्यांना काही आईडियास आम्ही इथे सुचवल्या आहेत.
1.ऑनलाइन बुटीक
कसे कार्य करते : तुम्ही कपडे ,accessories किंवा shoes विकण्यासाठी Online Store सुरु करा. ज्यामध्ये तुम्ही केलेल्या designs विकू शकता किंवा इतर brands मधून निवडलेली Products विकू शकता .
फायदे : Flexibility , तुमची creativity ,विशिष्ट फॅशन क्षेत्रांना टार्गेट करण्याची संधी.
2.बालसंगोपन केंद्र (Homebased Daycare )
कसे कार्य करते : तुम्ही आपल्या घरीच Daycare सेवा सुरु करू शकता. जिथे दिवसभर लहान मुलांची काळजी घेतली जाईल व त्यांच्यासाठी विविध उपक्रम आयोजित करता येतील .
फायदे : यात तुम्हाला कमी भांडवल लागेल गुंतवणूक करण्यासाठी शिवाय समाधानकारक आणि अर्थपूर्ण काम आहे , तसेच बालसंगोपन सेवांची सध्या खूप वाढती मागणी आहे कारण आई आणि वडील दोघेही जॉब करत असल्यामुळेत्यांना मुलांना सांभाळणे शक्य होत नाही.
3.मेकअप आर्टिस्ट (Makeup Artist)
कसे कार्य करते : लग्नसमारंभ , photoshoots यांसारख्या कार्यक्रमासाठी मेकअप ची सर्विस तुम्ही provide करू शकता किंवा ऑनलाईन video बनवून शिकवू शकता.
फायदे : तुमच्या सोयीनुसार करता येण्या सारखे काम आहे तसेच त्यासाठी लागणारे वेळापत्रक तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवू शकता आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर तुमचा व्यवसाय वाढण्याच्या अनेक संधी तुम्हाला भेटत जाईल.
4.बेकिंग किंवा केक डेकॉरेटिंग (Baking And Cake Decorating)
कसे कार्य करते:
आताच्या जनरेशन मध्ये कुठलाही इव्हेंट किंवा समारंभ असेल तर केक मागवलाच जातो वाढदिवस असो, anniversary असो किंवा मग Engagement असो. त्यात तुम्ही केक, cupcake किंवा खास बनवलेला पदार्थ add करा. ज्यामध्ये तुम्ही कस्टमरने सांगितल्याप्रमाणे कलर व design बनवा किंवा त्यांना unique वाटेल असा केक बनवून देऊ शकता जसे ,त्यांचा photo त्यात add करून देऊ शकता .
फायदे: यामध्ये सुरुवातीला कमी खर्च लागेल तसेच तुम्हाला तुमची creativity दाखवता येईल त्याच्यामुळे तुमचे कस्टमर रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहे.
5.हाताने बनवलेली ज्वेलरी (Handmade Jewellry)
कसे कार्य करते:
यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या designs ,वेगवेगळ्या कलरच्या पद्धतीने बनवू शकता, जसे तुमच्या client हवे तसे.त्याला कस्टमाइझ (customize) करणे असे म्हणतात. आता हि बनवलेली ज्वेलरी तुम्ही तुमच्या वेबसाईट वर टाकून विकू शकता.
फायदे: ह्या business मध्ये तुम्ही खूप वराईटिस बनवू शकता तसेच हा खूप वाढत जाणारा business आहे. शिवाय कमी खर्चमध्ये सुरु करता येऊ शकतो.